मुंबई : संजय राऊत यांनी नुकताच पूरस्थितीवरून सरकारवर जोरदार टीका केली. हेच नाही तर मदतीचे निकष बदलले पाहिजे असेही त्यांनी म्हटले. आता दसरा मेळाव्याला राज ठाकरे यांना बोलवणार का? या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलंय. संजय राऊत यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही बंधू एकत्र आलेले. संवाद साधत आहेत.. दसऱ्याला वैचारिक सोन्याचं अदान-प्रदान होऊ शकत. त्यांना निमंत्रणासाठी परंपरांनी ज्यागोष्टी करायच्या आहेत त्या करू आमचा संघाचा मेळावा नाही आमचा मेळावा परंपरेचा आम्ही त्याचे पालन करू. हा देश हिंदूंचा आहे आणि या देशात हिंदूत्ववाद राहणार असल्याचे ठणकावून सांगताना संजय राऊत दिसले.
गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगताना दिसत आहे की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दसरा मेळाव्याला आपली युती जाहीर करू शकतात. त्यावरच आता संजय राऊतांनी उत्तर दिले. एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याबद्दल बोलताना राऊतांनी म्हटले की, गुजरात सूरज, अहमदाबाद याठिकाणी जाऊन शिंदेंनी त्यांचा दसरा मेळावा घ्यायला पाहिजे. इथे कशाला ढोंग करत आहात. कोण आहात तुम्ही? असेही राऊतांनी म्हटले.
मीच बाळासाहेब ठाकरे असा त्यांचा सिनेमा काढण्याचेच बाकी आहे. बाळासाहेबांसारखी शाल घेऊन शिंदेंनी फोटो काढल्याचे मी बघितले. मुंबईचा मेळावा हा बाळासाहेब ठाकरे यांचा मेळावा आणि ते उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरू बाकी सर्व बोगस आहे. त्यांनी गुजरातमध्ये जाऊन मेळावा घेतला पाहिजे. सूरत अमदाबादमध्ये तिकडे गोंधळ का करतात. जया शहाला त्यांच्या मेळाव्याला बोलावले पाहिजे.
कॅबिनेट त्यांनी थाट माट न करता ज्याठिकाणी पूरपरिस्थिती आहे तिथे केल्या पाहिजे होत्या. आव्हाल दिल्ली गेला का नाही माहिती नाही. कॅबिनेट दुष्काळ निष्कर्ष बदल्याची गरज असल्याचे राऊतांनी म्हटले. 6 हजारची मदत थट्टा आहे. बँक वसुली घोटाळा करणाऱ्या नेत्याकडून वसूल करावी. सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीवरून संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. शिवाय त्यांनी काही गंभीर आरोपही केली.